करोनाचा मुकाबला करण्यास महाराष्ट्राने कंबर कसली

करोनाचा मुकाबला करण्यासाठी 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जीवनावश्यक सेवा सोडून मुंबई महानगर प्रदेशसह नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्यात येत आहेत. येत्या 31 मार्चपर्यत ही बंदी राहणार असून आज मध्यरात्रीपासूनच त्याची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच रेल्वे, बसेस आणि बँका या अत्यावश्यक सेवा असल्याने त्या बंद करण्यात येणार नसल्याचं सांगतानाच रेल्वे, बसेस बंद करण्याची वेळ येऊ देऊ नका. गर्दी टाळा, असं आवाहनही त्यांनी राज्यातील नागरिकांना केलं आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधत मोठा निर्णय जाहीर केला. जगण्यासाठी लोक धडपडतात, संघर्ष करतात. आता जगण्यासाठी घरात बसावे लागत आहे. संपूर्ण जगाला घरात राहावे लागत आहे. त्यामुळे तुम्ही घरात राहा. हे युद्ध आहे, संपर्क आणि संसर्ग टाळूनच हे युद्ध जिंकता येतं. संपर्क आणि संसर्ग हे या युद्धाचे हे दोन शस्त्र आहेत. त्यामुळे घरातच थांबा, बाहेर पडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं असून करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून त्यांनी वेळीच तातडीने उपाययोजना केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारची पावले योग्य दिशेने पडत आहेत, परंतु हे युद्ध फक्त एकट्या सरकारला, सरकारच्या चारदोन यंत्रणांना लढता येणारे नाही. यामध्ये प्रत्येक नागरिकाने सहभाग देण्याची आवश्यकता आहे. धार्मिक विधी, प्रार्थनांच्या निमित्ताने एकत्र येणार्‍या विविध धर्मीयांनीही कर्मकांडांना फाटा देऊन सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. गर्दी टाळणे, अनावश्यक प्रवास टाळणे, स्वच्छता पाळणे यासह काही बंधने लोकांनी आपण होऊन पाळली तर करोनाला रोखण्यात महाराष्ट्र सर्वात आघाडीवर राहील. 


Popular posts
आतापर्यंत 1498 रुग्ण, 45 मृत्य; झारखंडमध्ये मलेशियातून शिक्षण घेण्यासाठी आलेली महिला पॉझिटिव्ह
इंदूरमध्ये कोरोनाचे 24 प्रकरणे उघडकीस आल्यानंतर निर्णय, आजपासून 1 एप्रिलपर्यंत सर्वकाही बंद
आतापर्यंत 1127 प्रकरणे; लष्करात तिसरा कोरोनाग्रस्त आढळला, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर साथीदार आयसोलेशनमध्ये
सर्व माध्यम संस्थांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे, सरकारच्या सूचना
काेराेना पीडिता म्हणते, गांधीजी-नेल्सन मंडेला वर्षानुवर्षे तुरुंगात राहू शकतात, तर मी २-३ आठवडे एकांतवासात का राहूू शकत नाही ?