काेराेना पीडिता म्हणते, गांधीजी-नेल्सन मंडेला वर्षानुवर्षे तुरुंगात राहू शकतात, तर मी २-३ आठवडे एकांतवासात का राहूू शकत नाही ?

नवी दिल्ली - १३ मार्चला दिल्लीतील एका ५० वर्षीय टुरिस्ट गाइड इटलीच्या महिलेला दिल्लीच्या संग्रहालयात घेऊन गेली हाेती. दुसऱ्याच दिवशी या गाइडला ताप आला. तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर या महिलेने विलगीकरण केले व उपचार सुरू केले. हा फार माेठा आजार नाही फक्त थाेडी काळजी घेतली पाहिजे असे ही महिला म्हणते. जर गांधीजी व नेल्सन मंडेला वर्षानुवर्ष तुरुंगात राहू शकतात, तर मी दाेन-तीन आठवड्यांसाठी एकांतवासात का राहू शकत नाही? संसर्गमुक्तीसाठी आठवड्यापासून एका बंद खाेलीत कुणालाही न भेटता कसे दिवस व्यतीत करत आहे, हे सांगतेय ही कोरोनापीडित महिला..


एकांतवासात करत आहे अनेक कामे पूर्ण, प्राणायाम व व्यायामातून झाल्या ताजातवान्या


माझे नाव मृगनयनी (नाव बदलले आहे) आहे. तपासणीमध्ये काेराेना संसर्ग झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर मी स्वत:ला २४ मार्चपासून एकांतवासात ठेवले आहे. माझा २० वर्षांचा मुलगा दुसऱ्या खाेलीत राहत आहे. उर्वरित जगाशी संपर्क साधण्यासाठी ताेच माझा एक आधार आहे. मी दरवाजासमाेर पाण्याची बाटली उघडून ठेवतेे. ताे त्यात पाणी टाकताे. मुलाला जास्त त्रास हाेऊ नये म्हणून वाफ घेण्यासाठी स्टिम इन्हेलर आणि मायक्राेवेव्ह आेव्हन खाेलीत आणून ठेवला आहे. मी घरात एकांतवासात राहूू शकते व ताप आला तर पॅरासिटामाॅल घेऊ शकते श्वासोच्छ्वासाचा त्रास झाला तर रुग्णालयात दाखल हाे, असे डाॅक्टरांनी सांगितले आहे. २७ मार्चपर्यंत तीन दिवस ताप आला. दाेन दिवस डाव्या नाकपुडीतून श्वास घेताना इतकी जळजळ व्हायची की जणू काही नाकात जळती फुलबाजी गेली आहे की काय असे वाटायचे. गेले तीन दिवस अिजबात ताप आलेला नाही. घसा खवखवला तर तुळस, आले, मिरी, लवंग यांचा काढा घेत आहे. गुळणा करण्यासाठी मिठाचे पाणी घेत आहे. त्यामुळे बराच आराम वाटला. प्राणायाममुळे खूप ऊर्जा मिळाली. सकाळ, संध्याकाळ प्राणायाम केल्यामुळे मी एक मिनटांपेक्षा जास्त वेळ श्वास राेखून ठेवू शकते याची जाणीव झाली. डाॅक्टर म्हणाले हाेते, जे आवडेल ते खा. मुलाने स्वत: बनवलेले खाद्यपदार्थ मी खात आहे. ताे पिझ्झा, बर्गर, स्पेगेटी खूप खाताे. तेच ताे मलाही देत आहे. अपूर्ण कामे पूर्ण केली. अर्धवट कादंबरी पूर्ण वाचून काढली. तीन ब्लाॅग लिहिले. काेराेनाकडे घृणास्पद नजरेतून बघू नका. हा आजार नाही तर सावध राहण्याचे दुसरे रूप आहे.


Popular posts
इंदूरमध्ये कोरोनाचे 24 प्रकरणे उघडकीस आल्यानंतर निर्णय, आजपासून 1 एप्रिलपर्यंत सर्वकाही बंद
आतापर्यंत 1127 प्रकरणे; लष्करात तिसरा कोरोनाग्रस्त आढळला, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर साथीदार आयसोलेशनमध्ये
आतापर्यंत 1498 रुग्ण, 45 मृत्य; झारखंडमध्ये मलेशियातून शिक्षण घेण्यासाठी आलेली महिला पॉझिटिव्ह
सर्व माध्यम संस्थांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे, सरकारच्या सूचना