आतापर्यंत 1127 प्रकरणे; लष्करात तिसरा कोरोनाग्रस्त आढळला, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर साथीदार आयसोलेशनमध्ये

नवी दिल्ली - देशभरात कोरोना व्हायरसची आतापर्यंत 1127 प्रकरणे समोर आले आहेत.


लष्करातही तिसरा कोरोनाग्रस्त आढळला आहे. श्रीनगरच्या टेरिटोरियल आर्मीतील एका सूबेदाराला कोरोनाची लागण झाली आहे. अधिकाऱ्यांनी त्याच्यासोबत असलेल्या इतर साथीदारांनाही आयसोलेशनमध्ये टाकले आहे.


आज केरळमध्ये 20 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. यासोबतच आज महाराष्ट्रात 7, जम्मू-काश्मीरमध्ये 5, उत्तरप्रदेशमध्ये 4, गुजरातमध्ये 3 आणि राजस्थानमध्ये 2 रुग्ण आढळले. संक्रमणामुळे मरणाऱ्यांची संख्या आता 30 वर गेली आहे. यात सर्वात जास्त 8 महाराष्ट्रात आहेत. यातही 7 जण मुंबईतील आणि 1 बुलडाण्यातील आहे. देशातील एकूण संक्रमितांचा आकडा covid19india.org वेबसाइटच्या आकडेवारीनुसार आहे.


शनिवारी रात्री उशिरा मध्यप्रदेशात 5 नवीन केस (इंदूर 4, उज्जैन 1) समोर आल्या आहेत. भीलवाडामध्ये रविवारी आणखी एक संक्रमित आढळून आला. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीत सध्या कोरोना संक्रमितांची संख्या 1050 आहे आणि 86 ठीक झाले आहेत. शनिवारी देशभरात कोरोना संक्रमणाचे 179 केस समोर आल्या. वृत्तसंस्था पीटीआयनुसार हा देशातील एका दिवसातील कोरोना संक्रमणाचा सर्वात मोठा आकडा आहे. याआधी शुक्रवारी 151 लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या दरम्यान रविवारी सकाळी विशेष विमान इराणहून 275 भारतीयांना घेऊन राजस्थानच्या जोधपुरला पोहोचले. या लोकांना येथील लष्कराच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. याआधी देखील 277 भारतीयांना इराणमधून बाहेर काढले होते. त्यांना देखील याच सेंटरमध्ये ठेवले आहे.


केरळमध्ये लॉकडाउनचे नियम भंग केल्या प्रकरणी पादरी, दोन नन ताब्यात


देशभर कोरोनाविरोधात लॉकडाउन असताना त्याचा भंग केल्या प्रकरणी केरळमध्ये 1 पादरी आणि 2 नन या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संचारबंदी असतानाही त्यांनी संडे प्रेअरचे आयोजन केले होते. केरळच्या वायनाड येथे या तिघांच्या विरोधात कलम 269 (महामारी दरम्यान निष्काळजीपणा) आणि भारतीय दंड विधानाच्या कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


देशातील इतर राज्यांतील परिस्थिती



  • मध्यप्रदेश; एकूण संक्रमित - 39 : मध्यप्रदेशात शनिवारी रात्री उशिरा 5 नवीन प्रकरणे समोर आली. यातील 4 इंदूर तर 1 जण उज्जैनमध्ये आढळला. इंदूरमध्ये मिळालेले चारही रुग्ण पुरुष असून त्यांचे वय 48 वर्षे, 40 वर्षे, 38 वर्षे आणि 21 वर्षे आहे. तर उज्जैनमध्ये 17 वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आता इंदूरमध्ये सर्वाधिक 20 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर जबलपूर - 8, भोपाळ - 3, शिवपुरी-ग्वालियर - प्रत्येकी 2 संक्रमित आहेत. तर राज्यात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.


Popular posts
आतापर्यंत 1498 रुग्ण, 45 मृत्य; झारखंडमध्ये मलेशियातून शिक्षण घेण्यासाठी आलेली महिला पॉझिटिव्ह
सर्व माध्यम संस्थांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे, सरकारच्या सूचना
इंदूरमध्ये कोरोनाचे 24 प्रकरणे उघडकीस आल्यानंतर निर्णय, आजपासून 1 एप्रिलपर्यंत सर्वकाही बंद
काेराेना पीडिता म्हणते, गांधीजी-नेल्सन मंडेला वर्षानुवर्षे तुरुंगात राहू शकतात, तर मी २-३ आठवडे एकांतवासात का राहूू शकत नाही ?