आतापर्यंत 1498 रुग्ण, 45 मृत्य; झारखंडमध्ये मलेशियातून शिक्षण घेण्यासाठी आलेली महिला पॉझिटिव्ह

नवी दिल्ली. महाराष्ट्रात कोविड- १९ रुग्णांची संख्या २३० वरुन ३०२ झाली आहे. तर उत्तर प्रदेशात संसर्ग झालेल्यांची संख्या १९ वरुन शंभरच्या पुढे गेली आहे. तिकडे झारखंडमध्ये पहिला रुग्ण आढळला आहे. १७ मार्चला देशात कोविड- १९ बाधितांची संख्या १०० पेक्षा थोडी जास्त होती. पुढील १२ दिवसात तो १०० वरुन एक हजारापर्यंत पोहोचला. देशात आतापर्यंत १४९८ पॉझिटिव्ह आहेत. ४५ मृत्यू झाले आहेत तर १२६ रुग्ण बरे झाले आहेत.


झारखंडः पहिला रुग्ण, मलेशियातून शिक्षण घेण्यासाठी आलेली महिला पॉझिटिव्ह


झारखंडमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. ३० मार्चला रांचीतील हिंदीपीढीतील मशिदीतून २४ जणांना काढण्यात आले होते. त्यातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. ती मलेशियातून येथे आली होती. रिम्समध्ये महिलेवर उपचार सुरू आहेत.


उत्तर प्रदेश: ५ नवे रुग्ण, आतापर्यंत १५ जिल्ह्यांत पॉझिटिव्ह आढळले आहेत राज्यात मंगळवारी ५ नवे रुग्ण आढळले. यामुळे येथे बाधितांची संख्या १०८ झाली. यूपीत आतापर्यंत १५ जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील ५०% नोएडा व मेरठचे आहेत. तिसऱ्या क्रमांकावर गाझियाबाद आहे. मेरठमध्ये एका कुटुंबातीलच १४ बाधित आढळले आहेत.


आसाम : डॉक्टराने कोरोनापासून वाचण्यासाठी मलेरियाचे औषध घेतले, मृत्यू


आसाममध्ये डॉ. उत्पलजीत यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी मलेिरयात दिले जाणारे औषध हायड्रोक्सीन घेतले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हे औषध कोरोनात िदले जात आहे. सरकारनेही कोणत्या स्थितीत त्याचा वापर करायचा याचे निर्देश दिले आहेत.


महाराष्ट्रः मुंबईत ५९ नवे रुग्ण, सर्वात जास्त कोरोनाबाधित याच शहरात


महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३० वरुन ३०२ झाली आहे. मुंबईत ५९ नवे रुग्ण आढळले आहेत. या शिवाय महाराष्ट्रात नगरमध्ये ३, पुण्यात २, ठाण्यात २, केडीएमसीत २, नवी मुंबईत २ आणि वसई- विरारमध्ये दोन रुग्ण आढळले. येथे देशातील सर्वाधिक रुग्ण आहेत.


Popular posts
आतापर्यंत 1127 प्रकरणे; लष्करात तिसरा कोरोनाग्रस्त आढळला, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर साथीदार आयसोलेशनमध्ये
सर्व माध्यम संस्थांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे, सरकारच्या सूचना
इंदूरमध्ये कोरोनाचे 24 प्रकरणे उघडकीस आल्यानंतर निर्णय, आजपासून 1 एप्रिलपर्यंत सर्वकाही बंद
काेराेना पीडिता म्हणते, गांधीजी-नेल्सन मंडेला वर्षानुवर्षे तुरुंगात राहू शकतात, तर मी २-३ आठवडे एकांतवासात का राहूू शकत नाही ?