नवी दिल्ली : काेराेना व्हायरसच्या भीतीमुळे अचानक करण्यात अालेले लाॅकडाऊन हे सर्वच नागरिकांसाठी अडचणीचे ठरत अाहे. त्यामुळे अनेक कामगारांना याचा माेठा फटका बसला. यांच्यावर उपासमारीची वेळ अाली अाहे. त्यामुळे या अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वांवर संकट अाेढावले अाहे,अशा शब्दात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना चिठ्ठी िलहली अाहे. त्यांनी या लाॅकडाऊनच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र,अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. यामुळे कामगारांना स्थलांतरीत करावे लागत असल्याचे ते म्हणाले.
देशात वेगळी परिस्थिती; अचूक निर्णय गरजेचा
भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेत वेगळी परिस्थिती अाहे. त्यामुळे याचा अभ्यास करूनच निर्णय घ्यायला हवा हाेता. कारण, भारतामध्ये माेठ्या संख्येत कामगार वर्ग अाहे. या अचानक लाॅकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम पडला अाहे. अातातरी याबाबत विचार करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.